नाटा 2020 परीक्षेत ‘राजमुद्रा’ची अदिती लूनिया नॅशनल टॉपर. (Rajmudra Tops Again Nata 2020)
पुणे – नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षीही ‘राजमुद्रा डिझाईन अॅॅकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नाटा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. अदिती लूनिया या अॅकॅडमीतील विद्यार्थिनीने 200 पैकी 183.5 गुण मिळवून नॅशनल टॉपर्सपैकी एक होण्याचा मान मिळविला आहे. त्याचप्रमाणे 30 विद्यार्थ्यांना 150 पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. सोबतच 60 विद्यार्थ्यांना 140 पेक्षा जास्त गुण भेटले आहेत. जेईई पेपर -२ मध्ये सुध्दा मानसी शितोळे या विद्यार्थिनीने 100 percentile पेकी 99.86 percentile गुण मिळवले आहेत. सोबतच 70 विद्यार्थ्यांना 90 percentile पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 300 विद्यार्थी यावर्षी यशस्वीरित्या NATA (नाटा) उत्तीर्ण झाले आहेत. ‘राजमुद्रा’चा यंदा रेकॉर्ड ब्रेक निकाल लागला आहे.
नाटाबद्दल अधिक माहिती देताना अॅकॅडमीचे संस्थापक नितीन मरकड म्हणाले की, ‘राजमुद्रा’ने यंदाच्या वर्षीही आपली यशाची परंपरा कायम राखली असून, यशाचा हा आलेख उंचावत ठेवला आहे. आर्किटेक्चर (बी. आर्च) करण्यासाठी NATA (National Aptitude Test For Architecture) ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी बारावी (सायन्स) ला पीसीएम ग्रुप असणे आवश्यक आहे. या परीक्षेची पूर्वतयारी करणे फायद्याचे ठरते. त्याच्या प्रशिक्षणासाठी 2011पासून कार्यरत असणार्या आर्किटेक्चर स्पेशलाईज्ड् ‘राजमुद्रा डिझाईन अॅकॅडमी’च्या शाखा पुणे व नगर या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आर्किटेक्चर हे एक नव्या जनरेशनला आपल्याकडे खेचणारे एक ग्लॅमरस करिअर आहे. इथे तुमच्या कल्पकतेला प्रोत्साहन दिलं जातं. आर्किटेक्चरकडे करिअर म्हणून पाहिलं तर ती एक योग्य व नवी वाटचाल ठरते आहे. आर्किटेक्ट होण्यासाठी बारावीनंतर बी. आर्च हा डिग्री कोर्स पूर्ण करावा लागतो. त्यापुढेही मास्टरज्करिता लँडस्केप डिझाईन, इंटेरिअर डिझाईन, सस्टेनेबल डिझाईन यासारखे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.
राजमुद्रा डिझाईन अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक नितीन मरकड यांचे पालकांकडून व सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Leave a Reply